Ajaj Beg

Thursday, 29 October 2020

म्हणी अर्थासह


म्हणी अर्थासह

१ ती तिथे माती – कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानकारकच होतो. 

 

२ अतिशहाणा त्याचा बैल रिकामा – जो माणूस फार शहाणपणा करायला जातो,त्याचे मुळीच काम होत नाही. 

 

३ अडला हरी गाढवाचे पाय धरी – शहाण्या माणसाला प्रसंगी मूर्खाची विनवणी करावी लागते.

 

४ असतील शिते,तर जमतील भुते – आपला भरभराटीचा काळ असला,तर आपल्याभोवती माणसे गोळा होतात. 

 

५ आग सोमेश्वरी,बंब रामेश्वरी – जेथे मदतीची गरज आहे ,तेथे ती न पोहोचता भलत्याच ठिकाणी पोहोचणे. 

 

६  आगीतून फुफाट्यात – लहान संकटातून अधिक मोठ्या संकटात सापडणे. 

 

७ आधी पोटोबा मग विठोबा – आधी स्वतःच्या पोटापाण्याचा विचार करणे व नंतर अन्य काम करणे. 

 

८ अंथरूण पाहून पाय पसरावे – ऐपतीच्या मानाने खर्च करावा. 

 

९ आवळा देऊन कोहळा काढणे- क्षुल्लक वस्तूच्या मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे. 

 

१० आयत्या बिळात नागोबा- दुसऱ्याच्या कष्टावर स्वार्थ साधणे. 

 

११ आलीया भोगासी असावे सादर – जे नशिबात असेल,ते भोगायला तयार असावे. 

 

१२ आपला हात जगन्नाथ – आपले काम पार पाडण्यासाठी स्वतःच कष्ट सोसणे योग्य ठरते. 

 

१३ आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार ?- जे मुळात अस्तित्वातच नाही त्याची थोडीदेखील अपेक्षा करणे व्यर्थ होय. 

 

१४ आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन – किमान लाभाची अपेक्षा केली असताना,अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक लाभ होणे . 

 

१५ असंगाशी संग प्रणाशी गाठ – दुर्जन मानसांशी संगत केल्यास प्रसंगी जिवालाही धोका निर्माण होतो. 

 

१६ अन्नछत्री जेवणे, वर मिरपूड मागणे – दुसऱ्याकडून आवश्यक ती धर्मार्थ मदत घ्यायची त्याशिवाय आणखीही काही गोष्टी मागून मिजास दाखवणे . 

 

१७ अंगाला सुटली खाज,हाताला नाही लाज – गरजवंताला अक्कल नसते. 

 

१८ अंगावरचे लेणे,जन्मभर देणे- दागिन्याकरिता कर्ज करून ठेवायचे आणि ते जन्मभर फेडीत बसायचे. 

 

१९ अंतकाळापेक्षा मध्यान्हकाळ कठीण – मरणाच्या वेदनापेक्षा भुकेच्या वेदना अधिक दुख:दायक असतात. 

 

२० अंधारात केले,पण उजेडात आले- कितीही गुप्तपणे एखादी गोष्ट केली तरी ती काही दिवसानी उजेडात येते. 

 

२१ अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे – नाव मोठे लक्षण खोटे.  

 

२२ अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था – अशक्य कोटीतील गोष्ट. 

 

२३ अती झाले अन आसू आले- एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला,की ती दुख:दायक ठरते. 

 

२४ अती परिचयात अवाज्ञा – जास्त जवळीकता झाल्यास अपमान होऊ शकतो . 

 

२५ अती झाले गावाचे अन पोट फुगले देवाचे- कृत्य एकाचे त्रास मात्र दुसऱ्यालाच . 

 

२६ अर्थी दान महापुण्य – गरजू माणसाला दान दिल्यामुळे पुण्य मिळते. 

 

२७ आईची माया अन पोर जाईल वाया – फार लाड केले तर मुले बिघडतात . 

 

२८ आपलेच दात आपलेच ओठ – आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिति निर्माण होते. 

 

२९ आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला – ज्या दोषाबद्दल आपण दुसऱ्याला हसतो ,तोच दोष आपल्या अंगी असणे . 

 

३० आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास – मुळातच आळशी असणाऱ्या माणसांच्या बाबतीत त्यांच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे . 

 

३१ आंधळं दळतं कुत्रं पीठ खातं – एकाने काम करणे व दुसऱ्याने त्याचा फायदा उठवणे .

  

३२ आंधळ्या बहीऱ्याची गाठ – एकमेकाना मदत करण्यास असमर्थ असणाऱ्या दोन माणसांची गाठ पडणे. 

 

३३ अगं अगं म्हशी मला कोठे नेशी ? चूक स्वतःच करून ती मान्य करावयाची नाही,उलट ती चूक दुसऱ्याच्या माथी मारून मोकळे होणे . 

 

३४ अडली गाय फटके खाय – एखादा माणूस अडचणीत सापडला की,त्याला हैराण केले जाते. 

 

३५. असेल त्या दिवशी दिवाळी नसेल त्या दिवशी शिमगा – अनुकूलता असेल तेंव्हा चैन करणे आणि नसेल तेंव्हा उपवास करण्याची वेळ येणे. 

 

३६ अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का ?- कोणत्याही गोष्टीला ठराविक मर्यादा असते. 

 

३७ अवशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप – अतिशय उतावळेपणाची कृती .  

 

३८ अती खाणे मासणात जाणे – अति खाणे शेवटी नुकसानकारकच ठरते . 

 

३९ अठरा नखी खेटरे राखी , वीस नखी घर राखी – मांजर घराचे तर कुत्रे दाराचे रक्षण करते. 

 

४० अवचित पडे , नि दंडवत घडे – स्वतःची चूक झकण्याचा प्रयत्न करणे . 

 

४१ अवसबाई इकडे पुनवबाई तिकडे – एकमेकींच्या अगदी विरुद्ध बाजू . 

 

४२ अंगापेक्षा बोंगा मोठा – मूळ गोष्टींपेक्षा तिच्या आनुषंगिक गोष्टींचा बडेजाव मोठा असणे . 

 

४३ आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कारटे – स्वतःच्या बाबतीत असणारे चांगले विचार दुसऱ्याच्या बाबतीत न ठेवण्याची वृत्ती असणे . 

 

४४   आपली पाठ आपणास दिसत नाही -स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाहीत . 

 

४५ आजा मेला नातू झाला – एखादे नुकसान झाले असता,त्याच वेळी फायद्याची गोष्ट घडणे. 

 

४६ आपल्याच पोळीवर तूप ओढणे – फक्त स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे . 

 

४७ आपण मेल्यावाचून स्वर्ग दिसत नाही – अनुभवाशिवाय शहाणपन नसते. 

 

४८ आयजीच्या जीवावर बायजी उदार – दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे.

 

४९ आग खाईल तो कोळसे ओखेल – जशी करणी तसे फळ. 

 

५० आधानातले रडतात व सुपातले हसतात- संकटात असतानाही दुसऱ्याचे दुख: पाहून हसू येते. 

 

५१ इकडे आड तिकडे विहीर – दोन्ही बाजूनी संकटात सापडणे .

 

५२ इच्छि परा ते येई घरा – आपण जे दुसऱ्याच्या बाबतीत चिंतितो तेच आपल्या वाट्याला येणे. 

 

५३ इच्छिलेले जर घडले तर भिक्षुकही राजे होते – इच्छेप्रमाणे सारे घडले तर सारेच लोक धनवान झाले असते. 

 

५४ इन मिन साडेतीन – एखाद्या कारणासाठी अगदी कमीत कमी लोक हजर असणे.

 

५५ ईश्वर जन्माला घालतो त्याच्या पदरी शेर बांधतो – जन्मास आलेल्याचे पालन पोषण होतेच. 

 

५६ उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग – उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन करणे. 

 

५७ उचलली जीभ लावली टाळ्याला – विचार न करता वाटेल ते आमर्यादपणे बोलणे . 

 

५८ उथळ पाण्याला खळखळाट फार – ज्याच्या अंगी मुळातच गुण कमी असतात ,तो मनुष्य फार बढाई मारतो. 

 

५९ ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये – एखादी गोष्ट आवडली असली तरी तिचा अतिलोभ बाळगू नये. 

 

६० एक ना धड भाराभर चिंध्या – एकाच वेळी अनेक कामे स्वीकारल्याने शेवटी कोणतेही काम पूर्ण न होणे. 

 

६१ उंदराला मांजराची साक्ष – ज्याचे एखाद्या गोष्टीत हित आहे त्याला त्या गोष्टीबाबत विचारणे व्यर्थ असते. 

 

६२ उठता लाथ बसता बुक्की – प्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडवण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे. 

 

६३ उडत्या पाखराची पिसे मोजणे – अगदी सहज चालता – चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे. 

 

६४ उतावळी बावरी म्हाताऱ्याची नवरी – अति उतावळेपणा नुकसानकारकच असतो . 

 

६५ उद्योगाचे घरी रिद्धि सिद्धी पाणी भरी – जेथे उद्योग असतो तेथे संपत्ती येते. 

 

६६ उंबर पिकले आणि नडगीचे डोळे आले – फायद्याची वेळ येणे;पण लाभ न घेता येणे . 

 

६७ उराचे खुराडे आणि चुलीचे तुणतुणे -अतिशय हलाखीची स्थिति . 

 

६८ उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी – प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो . 

 

६९ उकराल माती तर पिकतील मोती – मेहनत केल्यास चांगले पीक येते .  

 

७० उखळात डोके घातल्यावर मुसळाची भीती कशाला ?- एखादे काम करायला घेतल्यावर त्यासाठी पडणाऱ्या श्रमांचा विचार करायचा नसतो . 

 

७१ उचल पत्रावळी,म्हणे जेवणारे किती ?- जे काम करायचे ते सोडून देऊन भलत्याच चौकशा करणे. 

 

७२ उडाला तर कावळा , बुडाला तर बेडूक- एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागते. 

 

७३ उधारीचे पोते,सव्वा हात रिते – उधारीने घेतलेला माल नेहमीच कमी भरतो. 

 

७४ उभारले राजवाडे तेथे आले मनकवडे – श्रीमंती आली की, तिच्या मागोमाग हाजी-हाजी करणारेही येतातच . 

 

७५ उभ्याने यावे आणि ओणव्याने जावे – येते वेळी ताठ मानेने यावे आणि जाते वेळी खाली मान घालून जाणे . 

 

७६ ऊसाच्या पोटी कापुस- सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती . 

 

७७ एका माळेचे मणी – सगळीच माणसे सारख्याच स्वभावाची असणे. 

 

७८ एका हाताने टाळी वाजत नाही – दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही .

   

७९  एक ना धड भाराभर चिंध्या – एकाच वेळी अनेक कामे स्वीकारल्यामुळे शेवटी कोणतेही काम पूर्ण न होणे. 

 

८० ऐकावे जनाचे करावे मनाचे- कोणत्याही कामाबाबत दुसऱ्याचे मत घ्यावे;परंतु शेवटी सारासार विचार करून आपल्या मताप्रमाणे वागावे. 

 

८१ एकाची जळते दाढी दुसरा त्यावर पेटवू पाहतो विडी - दुसऱ्याच्या अडचणींचा विचार न करता त्यातही स्वतःचा फायदा पाहण्याची वृत्ती असणे. 

 

८२ एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये – दुसऱ्याने केलेल्या मोठ्या वाईट गोष्टींकडे बोट दाखवून आपण केलेल्या वाईट गोष्टीचे समर्थन करू नये. 

 

८३ एका पिसाने कुणी मोर होत नाही- थोड्याशा यशाने हुरळून जाणे. 

 

८४ एका खांबावर द्वारका – एकाच व्यक्तीवर सर्व जबाबदऱ्या असणे. 

 

८५ एक कोल्हा सतरा ठिकाणी व्याला – एका व्यक्तिपासून अनेक ठिकाणी उपद्रव होणे. 

 

८६ एका कानावर पगडी,घरी बाईल उघडी – बाहेर बडेजाव;पण घरी दारिद्रय. 

 

८७ एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत – दोन तेजस्वी माणसे एकत्र गुण्या-गोविंदाने राहू शकत नाहीत. 

 

८८ ऐंशी तेथे पंचाऐंशी – अतिशय उधळेपणाची कृती. 

 

८९ ऐरावत रत्न थोर , त्याशी अंकुशाचा मार – मोठ्या व्यक्तीला यातनाही  तेवढ्याच असतात . 

 

९० ओळखीचा चोर जिवे न सोडी – ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षाही भयंकर असतो. 

 

९१ ओठ फुटो किंवा खोकाळ फुटो / शेंडी तुटो की तारंबी तुटो – कोणत्याही परिस्थितीत काम तडीस नेणे. 

 

९२ ओझे उचल तर म्हणे बाजीराव कोठे ? – सांगितलेले काम सोडून नसत्या चौकशा करणे. 

 

९३ औट घटकेचे राज्य – अल्पकाळ टिकणारी गोष्ट . 

 

९४ कर नाही त्याला डर कशाला ? – ज्याच्याकडून गुन्हा घडलेला नाही,त्याला कशाचीही भीती बाळगण्याचे कारण नाही . 

 

९५ करावे तसे भरावे-दुष्कृत्य करणाऱ्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतातच . 

 

९६ कामापुरता मामा - गरजेपुरते गोड बोलणारा;मतलबी माणूस . 

 

९७ काखेत कळसा गावाला वळसा - हरवलेली वस्तू जवळपास असल्याचे लक्षात न आल्याने सर्वत्र शोधत राहणे. 

 

९८ कानामागून आली आणि तिखट झाली – एखाद्या व्यक्तीपेक्षा दुसरी व्यक्ती वयाने अगर अधिकाराने कमी असूनही दुसऱ्या व्यक्तीने अल्पावधीतच त्याच्यापेक्षा जास्त मानाची जागा काबीज करणे. 

 

९९ काळ आला होता,पण वेळ आली नव्हती – एखादे  घोर संकट येऊनही त्यातून सहीसलामत सुटणे. 

 

१०० कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही – क्षुद्र माणसाच्या निंदेने थोरांचे काहीच नुकसान होत नाही. 

 

१०१ कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ – आपलाच मनुष्य आपल्या नुकसानीला कारणीभूत होणे. 

 

१०२ कोठे इंद्राचा ऐरावत,कोठे शामभट्टाची तट्टाणी – अतिथोर माणूस व सामान्य माणूस यांची बरोबरी होऊच शकत नाही. 

 

१०३ कोळसा उगाळावा तितका काळाच – दुष्ट माणसाबाबत अधिक माहिती मिळवली असता , त्याची अधिकाधिक दुष्कृत्ये उजेडात येतात. 

 

१०४ कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही – निश्चित घडणारी घटना ,कुणाच्याही प्रयत्नाने टाळता येत नाही . 

 

१०५ कोंड्याचा मांडा करून खाणे – हलाखीच्या अवस्थेत,आपल्याला जे मिळत असेल त्यावर जगण्यात समाधान मानणे. 

 

१०६ कोल्हा काकडीला राजी – सामान्य कुवतीची माणसे क्षुद्र वस्तूच्या प्राप्तीनेही संतुष्ट होतात.         

 

१०७ करीन ते पूर्व – मी करेन ते योग्य,मी म्हणेन ते बरोबर अशा रीतीने वागणे.

 

१०८ करवतीची धार पुढे सरली तरी कापते,मागे सरली तरी कापते – काही गोष्टी केल्या तरी नुकसान होते नाही केल्या तरी नुकसान होते . 

 

१०९ करून करून भागला ,देवध्यानी लागला – भरपूर वाईट कामे करून शेवटी देव पुजेला लागणे. 

 

११० कणगीत दाणा तर भील उताणा – गरजेपुरते जवळ असले,की लोक काम करत नाहीत. 

 

१११ कधी तुपाशी तर कधी उपाशी – सांसारिक स्थिति नेहमीच सारखी राहत नाही . 

 

११२ कशात काय नि फाटक्यात पाय – वाईटात आणखी वाईट घडणे.

 

११३ काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही – रक्ताचे नाते तोडू म्हणता तुटत नाही. 

 

११४ काडीचोर तो माडीचोर – एखाद्या माणसाने क्षुल्लक अपराध केला असेल तर त्याचा घडलेल्या एखाद्या मोठ्या अपराधाशी संबंध जोडणे. 

 

११५ काजव्याचा उजेड त्याच्या अंगाभोवती – क्षुद्र गोष्टींचा प्रभावही तेवढ्यापुरताच असतो. 

 

११६ का ग बाई रोड तर म्हणे गावाची ओढ – निरर्थक गोष्टीची काळजी करणे. 

 

११७ कानात बुगडी,गावात फुगडी – आपल्या जवळच्या थोड्याशा संपत्तीचे मोठे प्रदर्शन करणे. 

 

११८ काल मेला आणि आज पितर झाला – अतिशय उतावळेपणाची वृत्ती. 

 

११९ काकडीची चोरी फाशीची शिक्षा – अपराध खूप लहान;पण त्याला दिली गेलेली शिक्षा मात्र खूप मोठी असणे. 

 

१२० काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता बरोबर होत नाही-जे काम भरपूर पैशाने होत नाही,ते थोड्याशा अधिकाराने होते.संपत्तीपेक्षा सत्ता महत्त्वाची ठरते. 

 

१२१ कावीळ झालेल्यास सर्व पिवळे दिसते – पूर्वग्रह दुषीत दृष्टी असणे . 

 

१२२ काशीत मल्हारी माहात्म्य – नको तिथे नको ती गोष्ट करणे . 

 

१२३ कावळा बसला अन फांदी तुटली – परस्परांशी कारण संबंध नसताना योगायोगाने दोन गोष्टी एकाच वेळी घडणे . 

 

१२४ काप गेले नि भोके राहिली – वैभव गेले अन फक्त त्याच्या खुणा राहिल्या. 

 

१२५ कुंभारणीच्या घरातला किडा कुंभारणीचा – दुसऱ्याच्या स्वाधीन झालेला माणूस आपली मते विसरतो , आपल्या ताब्यात आलेल्या वस्तूवर आपलाच हक्क प्रस्थापित करणे .

 

१२६ कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे – मुळचा स्वभाव बदलत नाही. 

 

१२७ कुडी तशी फोडी-देहाप्रमाणे आहार. 

 

१२८ केळीला नारळी आणि घर चंद्रमौळी – अत्यंत दारिद्रयाची अवस्था येणे. 

 

१२९ केस उपटल्याने का मढे हलके होते ? – जेथे मोठ्या उपायांची गरज असते तेथे छोट्या उपायांनी काही होत नाही. 

 

१३० केळी खाता हरखले ,हिशेब देता चरकले – एखाद्या गोष्टीचा लाभ घेताना गंमत वाटते,मात्र पैसे देताना जीव मेटाकुटीस येतो. 

 

१३१ कोणाच्या गाई म्हशी आणि कोणाला उठा बशी – चूक एकाची आणि शिक्षा मात्र दुसऱ्याला . 

 

१३२ खाई त्याला खवखवे – जो वाईट काम करतो ,त्याला मनात धास्ती वाटते . 

 

१३३ खाण तशी माती – आई वडिलांप्रमाणे मुलाची वर्तणूक असणे. 

 

१३४ खाईन तर तुपाशी,नाहीतर उपाशी – एक तर विलाशी जीवन उपभोगता येईल तेवढे उपभोगणे किंवा कंगाल स्थितीत जगणे यांपैकी एकाचीच निवड करणे. 

 

१३५ खायला काळ , भुईला भार – निरुद्योगी मनुष्य सर्वांना भारभूत होतो. 

 

१३६ खऱ्याला मरण नाही – खरे कधीच लपत नाही . 

 

१३७ खर्चणाऱ्याचे खर्चते आणि कोठावळयाचे पोट दुखते – खर्च करणाऱ्याचा खर्च होतो;तो त्याला मान्यही असतो;परंतु दुसराच एखादा त्याबद्दल कुरकुर करतो. 

 

१३८ खाऊ जाणे तो पचवू जाणे - एखादे कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यासही समर्थ असतो. 

 

१३९ खाऊन माजावे पण टाकून माजू नये – पैशाचा किंवा संपत्तीचा गैरवापर करू नये . 

 

१४० खोट्याच्या कपाळी गोटा – खोटेपणा,वाईट काम करणाऱ्याचे नुकसान होते.   

 

१४१ गरजवंताला अक्कल नसते – गरजू माणसास प्रसंगी मनाविरुद्ध गोष्टसुद्धा मान्य करावी लागते . 

 

१४२ गर्वाचे घर खाली – गर्विष्ठ माणसाला शेवटी पराभव किंवा अपमान स्वीकारावा करावा लागतो.

 

१४३ गरज सरो, वैद्य मरो – आपले काम संपताच उपकारकरत्याला विसरणे . 

 

१४४ गर्जेल तो पडेल काय ? – केवळ बडबड करणाऱ्यांच्या हातून कोणतेही कार्य घडत नाही. 

 

१४५ गाढवाला गुळाची चव काय ? – अडाण्याला चांगल्या वस्तूचे मोल कळत नाही . 

 

१४६ गाव करी ते राव न करी – जे कार्य सामान्य माणसे एकजुटीच्या बळावर करू शकतात,ते कार्य एकटा श्रीमंत माणूस पैशाच्या बळावर करू शकत नाही. 

 

१४७ गाजराची पुंगी,वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली – एखादी गोष्ट साध्य झाली तर उत्तमच,नाही तर तिचा दुसरा काहीतरी उपयोग करून घेणे. 

 

१४८ गुरुची विद्या गुरूला फळली -एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे . 

 

१४९ गोगलगाय नि पोटात पाय – एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे .

 

१५० गळ्यात पडले झोंड हसून केले गोड – गळ्यात पडल्यावर वाईट गोष्टसुद्धा गोड मानून घ्यावी लागते. 

 

१५१ ग ची बाधा झाली – गर्व चढणे . 

 

१५२ गळ्यातले तुटले ओटीत पडले – नुकसान होता-होता टळणे. 

 

१५३ गाढवापुढे वाचली गीता,कालचा गोंधळ बरा होता – मूर्खाला कितीही उपदेश केला तरी त्याचा उपयोग नसतो . 

 

१५४ गाड्याबरोबर नळयाची यात्रा – मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होणे. 

 

१५५ गावंढया गावात गाढवीण सवाशीन – जेथे चांगल्यांचा अभाव असतो तेथे टाकाऊ वस्तूस महत्त्व येते. 

 

१५६ गाढवाच्या पाठीवर गोणी – एखाद्या गोष्टीची फक्त अनुकूलता असून उपयोग नाही;तर तिचा फायदा घेता यायला हवा . 

 

१५७ गाढवाने शेत खाल्ले,ना पाप,ना पुण्य – अयोग्य व्यक्तीला एखादी गोष्ट दिल्याने ती वायाच जाते. 

 

१५८ गाढवांचा गोंधळ व लाथांचा सुकाळ – मूर्खांच्या गोंधळात एकमेकांवर दोषारोप करण्यात वेळ जातो. 

 

१५९ गाय व्याली ,शिंगी झाली – अघटित घटना घडणे. 

 

१६० गांव जळे नि हनुमान बेंबी चोळे – दुसऱ्याचे नुकसान करून नामानिराळे राहणे. 

 

१६१ घरोघरी मातीच्याच चुली – सर्वत्र सारखीच परिस्थिति असणे . 

 

१६२ घरचे झाले थोडे व्याहयाने धाडले घोडे – अडचणीत आणखी भर पडण्याची घटना घडणे. 

 

१६३ घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात – एखाद्यावर प्रतिकूल परिस्थिति आली म्हणजे सारे त्याच्याशी वाईटपणे वागू लागतात. 

 

१६४ घर ना दार देवळी बिऱ्हाड – शिरावर कोणतीही जबाबदारी नसलेली व्यक्ती . 

 

१६५ घडाई परीस मढाई जास्त – मुख्य गोष्टीपेक्षा आनुषंगिक गोष्टीचा खर्च जास्त असणे. 

 

१६६ घेता दिवाळी,देता शिमगा – घ्यायला आनंद वाटतो द्यायच्या वेळी मात्र बोंबाबोंब.

 

१६७ घोडे कमावते आणि गाढव खाते – एकाने कष्ट करावे व निरुपयोगी व्यक्तीने त्याचा गैरफायदा घ्यावा . 

  

१६८ चार दिवस सासूचे,चार दिवस सुनेचे – प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी अधिकार गाजवण्याची संधी मिळतेच .

 

१६९ चोराच्या मनात चांदणे – आपले दुष्कृत्य उघडकीस येईल,अशी सदैव भीती वाटत राहणे.

 

१७० चोर सोडून संन्याशाला सुळी देणे – अपराध्याला सोडून निरपराध्याला शिक्षा देणे. 

 

१७१ चोरावर मोर – एखाद्या कृत्यावर सवाई कृत्य करून मात करणे.

 

१७२ चवलीची कोंबडी आणि पावली फळणावळ – मुख्य गोष्टीपेक्षा देखभालीचा खर्च जास्त असणे. 

 

१७३ चारजणांची आई बाजेवर जीव जाई – जबाबदारी अनेकांची असेल तर काळजी कोणीच घेत नाही . 

 

१७४ चिंती परा येई घरा – दुसऱ्याचे वाईट चिंतीत राहिले,की ते आपल्यावरच उलटते. 

 

१७५ चिखलात दगड टाकला आणि अंगावर शिंतोडा घेतला – स्वतःच्याच हाताने स्वतःची बदनामी करून घेणे . 

 

१७६ चुलीपुढे शिपाई अन् घराबाहेर भागुबाई – घरात तेवढा शूरपणाचा आव आणायचा;पण बाहेर मात्र घाबरायचे. 

 

१७७ चोराच्या उलट्या बोंबा – स्वतःच गुन्हा करून दुसऱ्याला दोष देणे . 

 

१७८ चोरांच्या हातची लंगोटी – ज्याच्याकडून काही मिळण्याची आशा नसते त्याच्याकडून थोडेतरी मिळणे. 

 

१७९ चोराची पावली चोराला ठाऊक – वाईट माणसांनाच वाईट माणसांच्या युक्त्या कळतात.

 

१८० जळात राहून माशाशी वैर करू नये – जेथे राहायचे तेथील माणसांबरोबर वैरभाव ठेवू नये. 

 

१८१ जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे – दुसऱ्याच्या अडीअडचणी,त्या परिस्थितीतून स्वतः गेल्याशिवाय कळत नाही . 

 

१८२ जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही – मुळचा स्वभाव कधीच बदलत नाही .

 

१८३ जे न देखे रवी , ते देखे कवी – कल्पनेच्या भरारीमुळे कवी वास्तवाच्या पलीकडचे वर्णन करू शकतो. 

 

१८४ ज्याची खावी पोळी , त्याची वाजवावी टाळी – ज्याने आपल्याला मदत केली त्याच्याशी अनुकूल असणे. 

 

१८५ जशी देणावळ तशी धुणावळ – मिळणाऱ्या मोबदल्यात प्रमाणातच काम करणे. 

 

१८६ जळत घर भाड्याने कोण घेणार ? – नुकसान करणाऱ्या गोष्टीचा स्वीकार कोण करणार ? बुडत्या बँकेचा पुढल्या तारखेचा चेक कोण घेणार ?

 

१८७ जित्या हुळहुळे आणि मेल्या कानवले – जितेपणी दुर्लक्ष करायचे व मेल्यावर कोडकौतुक करायचे. 

 

१८८ जेवेन तर तुपाशी नाहीतर उपाशी – अतिशय दुराग्रहाचे किंवा हटवादीपणाचे वागणे. 

 

१८९ जो गुळाने मरतो त्यास विष कशास ? – जेथे गोड बोलून काम होते तेथे जालीम उपायांची गरज नसते. 

 

१९० ज्या गावाच्या बोरी,त्या गावाच्या बाभळी – एकच स्वभाव असलेल्या माणसांनी एकमेकाची वर्मे काढण्यात अर्थ नसतो,कारण एकाच ठिकाणचे असल्याने ते एकमेकांना पुरेपूर ओळखतात. 

 

१९१ ज्याच्या हाती ससा,तो पारधी – ज्याच्या हाती वस्तू असते,त्याला त्याविषयीचे कर्तृत्व बहाल केले जाते,म्हणजेच एकाचे कर्तृत्व;पण ते दुसऱ्याच्या नावे गाजणे. 

 

१९२ ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे – एखाद्याचे भले करायला जावे तर तो त्या गोष्टीस विरोधच करतो व आपलाच हेका चालवण्याचा प्रयत्न करतो. 

 

१९३ झाकली मूठ सव्वा लाखाची – मौन पाळून अब्रू राखणे. 

 

१९४ टाकीचे घाव सोसल्यावाचून देवपन येत नाही – अपार कष्टावाचून मोठेपणा मिळत नाही . 

 

१९५ डोंगर पोखरून उंदीर काढणे – अतोनात श्रमानंतर अत्यल्प फायदा होणे . 

 

१९६ डोळ्यात केर आणि कानात फुंकर – रोग एका जागी व उपचार दुसऱ्या जागी.

 

१९७ ढवळया शेजारी पवळ्या बांधला वाण नाही ,पण गुण लागला – वाईट गुण मात्र लवकर लागतात म्हणजेच वाईट माणसांच्या संगतीने चांगला माणूसही बिघडतो. 

 

१९८ ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला,कुसंगे नाडला साधु तैसा – वाईट संगतीचे वाईटच परिणाम असतात. 

 

१९९ तळे राखी , तो पाणी चाखी – एखादी गोष्ट ज्याच्या स्वाधीन केली आहे,तो त्याचा थोडा तरी उपभोग घेणारच . 

 

२०० तहान लागल्यावर विहीर खणणे – एखाद्या वस्तूची गरज निर्माण झाल्यावर ती मिळवण्यासाठी धावपळ करणे . 

 

२०१ ताकापुरती आजी – स्वार्थ साधण्यापुरते एखाद्याचे गुणगान करणे . 

 

२०२ तरण्याचे कोळसे ,म्हाताऱ्याला बाळसे – अगदी उलट गुणधर्म दिसणे. 

 

२०३ तट्टाला टुमणी ,तेजीला इशारत – जी गोष्ट मूर्खाला शिक्षेनेही समजत नाही ती शहाण्याला मात्र फक्त इशाऱ्याने समजते . 

 

२०४ तीन दगडात त्रिभुवन आठवते – संसार केल्यावरच खरे मर्म कळते . 

 

२०५ तीथ आहे तर भट नाही ,भट आहे तर तीथ नाही – चणे आहेत तर दात नाहीत,दात आहेत तर चणे नाहीत. 

 

२०६ तुकारामबुवाची मेख – न सुटणारी गोष्ट . 

 

२०७ तू दळ माझे आणि मी दळीन गावच्या पाटलाचे – आपले काम दुसऱ्याने करावे, आपण मात्र लष्कराच्या भाकरी भाजाव्यात . 

 

२०८ तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले – मूर्खपणामुळे एकही गोष्ट साध्य न होणे . 

 

२०९ तेरड्याचा रंग तीन दिवस – कोणत्याही गोष्टीचा ताजेपणा किंवा नवलाई अगदी कमी वेळ टिकते. 

 

तोंड दाबून बुक्क्यांचा मार – एखाद्याला विनाकारण शिक्षा करणे आणि त्याला त्याबद्दल तक्रार करण्याचा मार्ग मोकळा न ठेवणे . 

 

२१० तोबाऱ्याला पुढे , लगामाला पाठीमागे – खायला पुढे ,कामाला मागे . 

 

२११ थेंबे थेंबे तळे साचे – थोडे थोडे साठवत राहिल्याने काही दिवसांनी त्याचा मोठा साठा होतो . 

 

२१२ थोरा घरचे श्वान सर्वही देती मान – मोठ्या माणसाचा आश्रय  हा प्रभावी ठरतो, असा आश्रय घेणाऱ्याला कारण नसताना मोठेपणा दिला जातो. 

 

२१३ दगडापेक्षा वीट मऊ – मोठ्या संकटांपेक्षा लहान संकट सुसह्य वाटते . 

 

२१४ दात आहेत तर चणे नाहीत ,चणे आहेत तर दात नाहीत – अनुकूल परिस्थितीचा उपयोग करून घेण्यासाठी योग्य ती गोष्ट योग्य वेळी न मिळणे . 

 

२१५ दाम करी काम – पैशाने सर्व कामे साध्य होणे . 

 

२१६ दिव्या खाली अंधार – मोठ्या माणसाच्या ठिकाणी देखील काही दोष हे असतातच . 

 

२१७ दुरून डोंगर साजरे – कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते,जवळून तिचे खरे स्वरूप कळून येते. 

 

२१८ देश तसा वेश – परिस्थिति लक्षात घेऊन त्यानुसार वागावे. 

 

२१९ देव तारी त्याला कोण मारी ? – देवाची कृपा असल्यावर कोणीही आपले वाईट करू शकत नाही ,अशी भावना.

 

२२० दैव देते,कर्म नेते – अनुकूल परिस्थितिचा फायदा उठवता न येणे.

 

२२१ दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ – भांडण करणाऱ्यांचा काहीही फायदा न होता त्यातून तिसऱ्याचाच फायदा होणे . 

 

२२२ दस की लकडी एक का बोजा – प्रत्येकाने थोडा हातभार लावल्यास सर्वांच्या सहकार्याने मोठे काम पूर्ण होते. 

 

२२३ दहा गेले,पाच उरले – आयुष्य कमी उरणे . 

 

२२४ दात कोरून पोट भरत नाही – मोठ्या व्यवहारात थोडीशी काटकसर करून काही उपयोग होत नाही . 

 

२२५ दाखविलं सोनं हसे मूल तान्हं – पैशाचा मोह प्रत्येकालाच असतो. पैशाची लालूच दाखविताच कामे पटकन होतात. 

 

२२६ दिल्ली तो बहुत दूर है – झालेल्या कामाच्या मानाणे खूप साध्य करावयाचे बाकी असणे . 

 

२२७ दिवस बुडाला मजूर उडाला – रोजाने वा मोलाने काम करणारा थोडेच स्वतःचं समजून काम करणार ? त्याची कामाची वेळ संपते ना संपते तोच तो निघून जाणार. 

 

२२८ दुभत्या गाईच्या लाथा गोड – ज्याच्यापासून काही लाभ होतो,त्याचा त्रासदेखील मनुष्य सहन करतो. 

 

२२९ दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते;पण आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही – दुसऱ्याचा लहानसा दोष आपल्याला दिसतो;पण स्वार्थामुळे स्वतःच्या मोठ्या दोषाकडे लक्ष जात नाही. 

 

२३० दुधाने तोंड भाजले,की ताकपण फुंकूंन प्यावे लागते – एखाद्या बाबतीत अद्दल घडली ,की प्रत्येक बाबतीत सावधगिरी बाळगणे. 

 

२३१ दे माय धरणी ठाय – पुरे पुरे होणे .

 

२३२ देखल्या देवा दंडवत – सहज दिसले म्हणून चौकशी करणे . 

 

२३३ देणे कुसळांचे घेणे मुसळाचे – पैसे कमी आणि काम जास्त . 

 

२३४ देखल्या देवा दंडवत – एखादी व्यक्ती सहज भेटली तर खुशाली विचारणे. 

 

२३५ दैव नाही लल्लाटी ,पाऊस पडतो शेताच्या काठी – नशिबात नसल्यास जवळ आलेली संधीसुद्धा दूर जाते . 

 

२३६ दैव आले द्यायला अन् पदर नाही घ्यायला – नशिबाने मिळणे;परंतु घेता न येणे. 

 

२३७ दैव उपाशी राही आणि उद्योग पोटभर खाई – नशीबावर अवलंबून असणारे उपाशी राहतात तर उद्योगी पोटभर खातात. 

 

२३८ दोन मांडवांचा वऱ्हाडी उपाशी – दोन गोष्टीवर अवलंबून असणाऱ्यांचे काम होत नाही . 

 

२३९ दृष्टीआड सृष्टि – आपल्यामागे जे चालते त्याकडे दुर्लक्ष करावे. 

 

२४० धर्म करता कर्म उभे राहते – एखादी चांगली गोष्ट करत असताना पुष्कळदा त्यातून नको ती निष्पत्ती होते. 

 

२४१ धाऱ्याला बोळा व दरवाजा मोकळा – छोट्या गोष्टीची काळजी घेणे परंतु मोठीकडे दुर्लक्ष करणे. 

 

२४२ धिटाई खाई मिठाई ,गरीब खाई गचांड्या – गुंड व आडदांड लोकांचे काम होते तर गरीबांना यातायात करावी लागते.

 

२४३ न कर्त्याचा वार शनिवार – अनेक सबबी सांगून कामाची टाळाटाळ करणे . 

 

२४४ नव्याचे नऊ दिवस – एखादी गोष्ट नवीन असेपर्यंत तिचे कोडकौतुक केले जाणे. 

 

२४५ नाव मोठे ,लक्षण खोटे – भपका मोठा,पण वस्तुस्थिति नेमकी विरुद्ध असणे.

 

२४६ नळी फुंकिली सोनरे इकडून तिकडे गेले वारे – केलेल्या उपदेशाचा काहीही उपयोग न होणे. 

 

२४७ नाचता येईना अंगण वाकडे – आपल्यातील उणेपणा झाकण्यासाठी दुसऱ्या वस्तूला नावे ठेवणे. 

 

२४८ नाकापेक्षा मोती जड – कनिष्ठ व्यक्ती वरिष्ठाहून वरचढ होणे;आपल्या सोईसाठी केलेली गोष्टच आपणास तापदायक ठरणे. 

 

२४९ नावडतीचे मीठ अळणी – नावडत्या माणसाने केलेले चांगले काम देखील वाईटच दिसते. 

 

२५० नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने – दोषयुक्त काम करणाऱ्यांच्या मार्गात एकसारख्या अनेक अडचणी येतात. 

 

२५१ नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ पाहू नये – नदीचे उगमस्थान व ऋषीचे कूळ पाहू नये,कारण त्यात काहीतरी दोष असतोच. 

 

२५२ नळी फुंकीली सोनारे इकडून तिकडे गेले वारे – केलेला उपदेश निष्फळ ठरणे पालथ्या घड्यावर पाणी ओतण्याचा प्रकार . 

 

२५३ नागेश्वरला नागवून सोमेश्वरला वात लावणे – एकाचे लुटून दुसऱ्याला दान करणे . 

 

२५४ नाव सोनूबाई हाती कथळाचा वाळा – नाव मोठे लक्षण खोटे .

 

२५५ नाव देवाचे आणि गाव पुजाऱ्याचे – देवाच्या नावाने स्वार्थ जपणे.

 

२५६ नाक दाबले, की तोंड उघडते – एखाद्या माणसाचे वर्म जाणून त्यावर योग्य दिशेने दबाव आणला,की चुटकीसरशी ताबडतोब हवे ते काम करून घेता येते. 

 

२५७ नागव्यापाशी उघडा गेला,सारी रात्र हिवाने मेला – आधीच दरिद्री असणाऱ्याकडे मदतीला जाणे . 

 

२५८ नागीन पोसली आणि पोसनाऱ्याला डसली – वाईट गोष्ट जवळ बाळगल्यावर ती कधी ना कधी उलटतेच . 

 

२५९ निंदकाचे घर असावे शेजारी – निंदा करणारा माणूस उपयोगी ठरतो;त्यामुळे आपले दोष कळतात. 

 

२६० नेसेन तर पैठणीच नेसेन , नाहीतर नागवी बसेन – अतिशय हटवादीपणाचे वर्तन . 

 

२६१ पळसाला पाने तीनच – कोठेही गेले तरी परिस्थिती सारखीच असणे. 

 

२६२ पाचामुखी परमेश्वर – पुष्कळ लोक जे बोलतात तेच योग्य मानणे. 

 

२६३ पालथ्या घागरीवर पाणी – केलेल्या उपदेशाचा काहीही परिणाम न होणे. 

 

२६४ पुढच्यास ठेच , मागचा शहाणा – दुसऱ्याचा अनुभव पाहून आपण त्यापासून धडा घेणे.

 

२६५ प्रयत्नांती परमेश्वर – कितीही अवघड गोष्ट प्रयत्नांनी साध्य होते . 

 

२६६ पदरी पडले पवित्र झाले – कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की त्यातील दोषांकडे दुर्लक्ष करून समाधान मानणे. 

 

२६७ पाचही बोटे सारखी नसतात – सर्व माणसे सारख्या स्वभावाची नसतात किंवा योग्यतेची नसतात. 

 

२६८ पी हळद नि हो गोरी – कोणत्याही गोष्टीचे फळ ताबडतोब मिळावे अशी चुकीची अपेक्षा बाळगणे . 

 

२६९ पायाची वहाण पायीच बरी – मूर्ख माणसाला अधिक सन्मान दिला तर तो शेफारतो . 

 

२७० पडलेले शेण माती घेऊन उठते – एखाद्या चांगल्या माणसावर काहीतरी ठपका आला आणि त्याने कितीही जरी निवारण केले तरी त्याच्या चारित्र्यावर थोडा का होईना डाग हा पडतोच. 

 

२७१ पाप आढ्यावर बोंबलते – पाप उघड झाल्याशिवाय राहत नाही . 

 

२७२ पायलीची सामसूम , चिपळ्याची धामधूम – जेथे मोठे शांत असतात तेथे छोटयांचा बडेजाव असतो. 

 

२७३ पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा,जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे – अनुभव घेतल्याशिवाय शहाणपण येत नाही . 

 

२७४ पाहुणी आली आणि म्होतुर लावून गेली – पाहुणे म्हणून येणे आणि नुकसान करून जाणे . 

 

२७५ पुत्र मागण्यास गेली ,भ्रतार घालवून आली – फायदा होईल म्हणून जाणे,परंतु नुकसान होणे. 

 

२७६ पुढे तिखट मागे पोचट – दिसायला फार मोठे;पण प्रत्यक्षात तसे नसणारे. 

 

२७७ पै दक्षिण लक्ष प्रदक्षिणा – पैसा कमी काम जास्त. 

 

२७८ पोटी कस्तुरी,वासासाठी फिरे भिरीभिरी – स्वतःजवळच असणारी वस्तू शोधण्यासाठी इतरत्र फिरणे . 

२७९ फासा पडेल तो डाव,राजा बोलेल तो न्याय – राजाने दिलेला न्याय मनाविरुद्ध असला तरी तो मानावाच लागतो . 

 

२८० फुले वेचली तेथे गोवऱ्या वेचणे – जेथे सुख भोगले तेथे वाईट दिवस पाहण्याचे नशिबी येणे. 

 

२८१ फुल ना फुलाची पाकळी – वास्तविक जितके द्यायला पाहिजे ,तितके देण्याचे सामर्थ्य नसल्यामुळे त्यापेक्षा पुष्कळ कमी देणे. 

 

२८२ फुटका डोळा काजळाने साजरा करावा – आपल्या अंगचा जो दोष नाहीसा होण्यासारखा नसतो,तो झाकता येईल तितकाच झाकावा. 

 

२८३ बळी तो कान पिळी – बलवान माणूस इतरांवर हुकूमत गाजवतो. 

 

२८४ बुडत्याचा पाय खोलात – माणसाची अवनती होऊ लागली म्हणजे ती अनेक बाजूंनी होऊ लागते. 

 

२८५ बैल गेला नि झोपा केला – एखादी गोष्ट होऊन गेल्यावर त्यासाठी केलेली व्यवस्था व्यर्थ ठरते . 

 

२८६ बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी – प्रत्यक्ष कृती न करता नुसती बडबड करणे. 

 

२८७ बडा घर पोकळ वासा – दिसण्यास श्रीमंती;पण प्रत्यक्षात तिचा अभाव.

 

२८८ बकरीचे शेपूट माशाही वारीना व लाजही राखीना – निरूपयोगी गोष्ट . 

 

२८९ बाप से बेटा सवाई -वाडिलांपेक्षा मुलगा अधिक कर्तबगार . 

 

२९० बाप तैसा बेटा – बापाच्या अंगचे गुण मुलात उतरणे. 

 

२९१ बावळी मुद्रा देवळी निद्रा – दिसण्यास बावळट;पण व्यवहारचतुर माणूस. 

 

२९२ बाजारात तुरी,भट भटणीला मारी – काल्पनिक गोष्टीवरून भांडण करणे.

 

२९३ बारक्या फणसाला म्हैस राखण – ज्याच्यापासून धोका आहे त्याच्याकडेच रक्षणाची जबाबदारी सोपवणे. 

 

२९४ बुडत्याला काठीचा आधार – घोर संकटाच्या काळी मिळालेली थोडीशी मदतदेखील महत्वाची वाटते. 

 

२९५ बोलेल तो करेल काय – केवळ बडबड करणाऱ्याकडून काहीही होऊ शकत नाही .

 

२९६ बोडकी आली व केसकर झाली – विधवा आली अन् लग्न लावून गेली. 

 

२९७ भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा – तातडीची गरज निर्माण झाल्यावर असेल त्या साधनाने ती भागवणे. 

 

२९८ भित्यापाठी ब्रम्हराक्षस – भित्र्या माणसावर अनेक संकटे कोसळतात. 

 

२९९ भरवशाच्या म्हशीला टोणगा – ज्याच्याकडून खात्रीने अपेक्षा करावी त्याच्याकडून अपेक्षाभंग होणे. 

 

३०० भीक नको ;पण कुत्रा आवर – ज्याच्याकडे मदतीच्या अपेक्षेने जावे त्याच्याकडून मदत न मिळता ,उलट संकट ओढवणे. 

 

३०१ भटाला दिली ओसरी;भट हातपाय पसरी – एखाद्याला आश्रय दिला तर तो त्यावर समाधान न मानता अधिक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतो. 

 

३०२ भिंतीला कान असतात – गुप्त गोष्ट उघड झाल्याशिवाय राहत नाही.

 

३०३ भीड भिकेची बहीण – उगाच मनात भीती बाळगून आपण एखाद्याला नकार देऊ शकलो नाही तर शेवटी आपणावर भीक मागण्याची पाळी येणे. 

 

३०४ भागीचे घोडे किवणाने मेले – भागीदारीतल्या गोष्टीचा लाभ सर्वच घेतात,काळजी मात्र कोणीच घेत नाही.

 

३०५ मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये – एखाद्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये. 

 

३०६ मुलाचे पाय पाळण्यात दिसतात – एखाद्याच्या भावी कर्तबगारीचा अंदाज त्याच्या बालपणीच बांधता येतो.

 

३०७ मनी वसे ते स्वप्नी दिसे – जशी इच्छा असेल तशी स्वप्ने पडणे. 

 

३०८ मनात मांडे पदरात धोंडे -केवळ मोठमोठी मनोराज्ये कारायचे ;परंतु प्रत्यक्षात पदरात काहीही पडत नाही अशी स्थिती. 

 

३०९ मनाची नाही,पण जनाची तरी असावी -एखादे वाईट कृत्य करताना मनाला काही वाटले नाही तरी जनाला काय वाटेल याचा विचार करावा. 

 

३१० मन जाणे पाप – आपण केलेले पाप दुसऱ्याला कळाले नाही तरी ज्याचे त्याला ते माहीत असते. 

 

३११ मन राजा मन प्रजा – हुकूम करणारे आपले मनच,ते पाळणारेही आपले मनच असते. 

 

३१२ मानकीस बोललं ,झुणकीस लागलं – एकाला बोलणे अन् दुसऱ्याला लागणे. 

 

३१३ मामुजी मेला अन् गाव गोळा झाला – क्षुल्लक गोष्टीचा गवगवा करणे. 

 

३१४ मांजरीचे दात तिच्या पिलास लागत नाहीत – आईवडिलांचे बोलणे लेकरच्या हिताचेच असते. 

 

३१५ मानेवर गळू आणि पायाला जळू – रोग एकीकडे उपाय भलतीकडे. 

 

३१६ मारूतीचे शेपूट – लांबत जाणारे काम . 

 

३१७ मुंगीला मिळाला गहू,कुठे नेऊ अन् कुठे ठेऊ ?- छोट्याशा गोष्टीने हुरळून जाणे. 

 

३१८ मुंगीला मुताचा पूर – लहान लोकांना लहान संकटही डोंगराएवढे वाटते. 

 

३१९ मूर्ख लोक भांडती, वकील घरे बांधती – मूर्खाचे भांडण अन् तिसऱ्याचा लाभ. 

 

३२० मेल्या म्हशीला मनभर दूध – मेल्यावर गुणगान करणे. 

 

३२१ म्हातारीने कोंबडे लपविले म्हणून उजाडायचे राहत नाही – निसर्गनियमानुसार ज्या घटना घडायच्या त्या घडतातच. 

 

३२२ म्हशीचे दूध काढताना आधी आचाळाला दूध लावावे लागते – फायदा उचलण्यासाठी आधी थोडी खुशामत करावी लागते. 


Tuesday, 14 January 2020

दहावी सराव संच ( कृतीपत्रिका )

👩‍🏫 दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव प्रश्नसंच

📝 विषय :- सर्व विषय


🖊 दहावीच्या बदलेल्या अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदाच परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ सराव प्रश्नसंच उपलब्ध करून देत आहे.


📝 विद्यार्थ्यांनीं सोडवायची कृतीपत्रिका ही संक्षिप्त उत्तरपत्रिका, व्हिडीओ यांच्या माध्यमातून तपासून आपल्या झालेल्या चुका दुरुस्त करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

🖇 प्रश्नसंच डाउनलोड करण्यासाठी लिंक 👇

📚 इंग्रजी
Download

📚 विज्ञान भाग 1 (मराठी)
Download

📚 विज्ञान भाग 2 (मराठी)
Download

📚 विज्ञान भाग 1 (इंग्लिश)
Download

📚 विज्ञान भाग 2 (इंग्लिश)
Download

📚 गणित भाग 1 (मराठी)
Download

📚 गणित भाग 2 (मराठी)
Download

📚 गणित भाग 1 (इंग्लिश)
Download

📚 गणित भाग 2 (इंग्लिश)
Download

📚 हिंदी लोकभारती
Download


📚 संस्कृत आनन्द:|
Download

📚 कुमारभारती (मराठी माध्यम)
Download


मित्रांनो, ही पोस्ट जास्तीत जास्त दहावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवा. 🙏

Wednesday, 9 October 2019

संकलित मूल्यमापन 1

संकलित मूल्यमापन 1

वर्ग 1 ते 7 सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध 2019 20

डाऊलोड

Thursday, 3 October 2019

कला,शारीरिक शिक्षण , कार्यांनुभव

कला,शारीरिक शिक्षण , कार्यांनुभव




प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी खालील निळा पटना ला टच करा


डाऊनलोड

Tuesday, 1 October 2019

दिवाळी अभ्यास शालेय विद्यार्थ्यांसाठी ( वर्ग 1 ते 8 वी पर्यंत )



इयत्ता १ ली

डाऊनलोड
इयत्ता २ री

डाऊलोड

इयत्ता ३री
डाऊनलोड

इयत्ता ४ थी

डाऊलोड

इयत्ता ५ वी

डाऊलोड

इयत्ता ६वी

डाऊलोड


इयत्ता ७ वी
डाऊलोड

इयत्ता ८ वी

डाऊलोड

वर्ग 1 ते 8 वी पर्यंत